नवी दिल्लीतील न्यू सीमापुरी परिसरात पाच मजली इमारत कोसळून चार जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी आहेत. मृतांमध्ये तीन महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. सुमारे २८ तास चाललेल्या बचावकार्यानंतरही ढिगाऱ्याखालून अवशेष सापडत असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. शेजारील इमारतीच्या पाडकामामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक संशय असून दंडाधिकारी चौकशी सुरू आहे.
दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली; चार ठार
Source: Prahaar