मुंबई महानगरपालिकेच्या 'पादचारी प्रथम' अभियानांतर्गत शिवडी येथील डी. जी. महाजनी व जेरबाई वाडीया मार्गालगतच्या पदपथावरील ०७ अनधिकृत दुकाने, १५ तात्पुरते शेड, ०२ कट्टे आणि २० फेरीवाल्यांवर गुरुवारी कारवाई करण्यात आली. एफ दक्षिण विभागाने ही मोहीम राबवली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पदपथ अडथळामुक्त करण्यासाठी हे अभियान सुरू असून, अनधिकृत बांधकाम किंवा साहित्य आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
शिवडीत पदपथावरील अनधिकृत दुकानांवर कारवाई
Source: Prahaar