महाराष्ट्रातील दुष्काळ कायमस्वरूपी संपवण्यासाठी 'पाणी अडवा, पाणी जिरवा' मोहिमेंतर्गत जलसंधारणाची कामे गतिमान करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांनी सर्व विभागांना समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले. यावर्षी वॉटर कप अभियान लवकर सुरू होत असून, पहिल्या पावसापूर्वी जलसंधारण संरचना सज्ज ठेवण्याचे नियोजन आहे.
पाण्याचा प्रत्येक थेंब अडवणार: मुख्यमंत्री फडणवीस
Source: Prahaar