मुंबई महापालिकेत सफाई कामगारांच्या भरतीच्या नावाखाली कामगार संघटनांकडून एक ते दीड लाख रुपये सदस्य नोंदणीच्या नावाखाली घेतल्याचा आरोप सभागृहनेते गणेश खणकर यांनी केला. स्थायी समिती बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. काही कामगारांनी दागिने विकून पैसे दिल्याचीही तक्रार आहे. अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी याची चौकशी करून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
सफाई कामगार भरतीत संघटनांकडून लाखोंची वसुली; आरोप
Source: Prahaar