देशातील 124 माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेचे खुल्या पत्राद्वारे समर्थन केले आहे. माजी परराष्ट्र सचिव कंवल सिब्बल यांच्यासह माजी आयएएस, आयएफएस व आयपीएस अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. मतचोरीच्या आरोपांना पडताळणीयोग्य पुरावे आवश्यक असल्याचे सांगत, घटनात्मक संस्थांवरील अकारण शंका लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचा इशारा त्यांनी दिला.
निवडणूक आयोगाला 124 माजी अधिकाऱ्यांचा पाठिंबा
Source: Sarkarnama