पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा रविवारी अकरावा दिवस होता. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन सरकारचा अंतिम मसुदा सादर केला आणि चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती जाहीर केली. समिती निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली काम करणार आहे. विद्यार्थ्यांनी आयोग अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासह पेपरफुटीच्या चौकशीची मागणी केली आहे.
MPSC आंदोलन: तुकाराम मुंढे चौकशी समितीचे सचिव
Source: Sarkarnama