पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर रविवाजी शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक घटस्थापना झाली. सुवर्ण मुखवट्याची मोहटेगाव ते गड मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आली. देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ जगताप यांच्या हस्ते महाभिषेक झाला. दुपारी महाआरतीनंतर देवीचे पहिले रूप दर्शनास खुले झाले. परिसरात भक्तिमय वातावरण असून वाहतुकीवर ताण आला.
मोहटादेवी गडावर घटस्थापनेने नवरात्रोत्सवास प्रारंभ
Source: Deshdoot