पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या बैठकीत आमदार जयंत पाटील यांनी AI मुळे IT क्षेत्रातील नोकऱ्यांवर संकट निर्माण होऊ शकते, अशी चिंता व्यक्त केली. पूर्वी आठ ते पंधरा दिवस लागणारे प्रोग्रामिंगचे काम आता काही तासांत होत असल्याने रोजगार धोक्यात असल्याचे ते म्हणाले. नोकऱ्या गेल्यास गृहकर्जाचे हप्ते बुडण्याचा धोका असून पदवीधरांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत प्रभावीपणे भूमिका मांडणारा सक्षम प्रतिनिधी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
AI मुळे IT नोकऱ्यांवर संकट: जयंत पाटील
Source: Lokshahi Marathi