केवळ मांस व प्राणिजन्य पदार्थांवर आधारित कार्निव्होर डाएट सोशल मीडियावर लोकप्रिय होत आहे. वजन घटणे, पोट फुगणे कमी होणे आणि टेस्टोस्टेरॉन वाढण्याचे दावे केले जातात, मात्र याला ठोस वैज्ञानिक पुरावे नाहीत. कर्बोदके व तंतुमय पदार्थ कमी मिळाल्याने दीर्घकाळ सेवन केल्यास आरोग्याला गंभीर धोका संभवतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कार्निव्होर डाएट: दावे आणि वैज्ञानिक पुरावे यातील तफावत
Source: BBC Marathi