मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांचा कारभार सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर चालविण्यासाठी केपीएमजी अॅडव्हायझरी सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीची वर्षभरासाठी तज्ज्ञ सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे. या सल्लागारावर वर्षाला ४२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. गोवंडी येथे ५८० खाटांचे रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय तसेच वांद्रे येथे नर्सिंग महाविद्यालय उभारण्यासह विविध सेवांसाठी पीपीपी अंतर्गत निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
महापालिका रुग्णालयांसाठी केपीएमजी सल्लागार नियुक्त
Source: Prahaar