दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरला आंदोलनाचे अधिकृत ठिकाण म्हणून दिलेली मान्यता रद्द केल्याचे वृत्त आहे. त्याऐवजी रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि सीबीडी मैदान ही तीन पर्यायी ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या समितीच्या शिफारशींनुसार हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. नव्या ठिकाणांसाठी नियमावली लवकरच जाहीर होणार असून, आंदोलकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
जंतरमंतरवरील आंदोलनांना बंदी, तीन पर्यायी ठिकाणे निश्चित
Source: Lokshahi Marathi