राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष कठोर न करता जास्तीत जास्त नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून शासकीय मदत मिळवून द्यावी, अशी सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना केली. सोमवारी मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत हे निर्देश देण्यात आले. बैठकीस मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दुष्काळग्रस्त मच्छीमारांना निकष न लावता मदत द्या: नितेश राणे
Source: Prahaar