कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईत पेटकेअर शिक्षण व प्रशिक्षण संस्था सुरू करण्याची घोषणा केली. पुण्यातील संस्थेच्या धर्तीवर हा उपक्रम राबवला जाईल आणि राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) पेटकेअरविषयक विशेष अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन आहे. नागरिकांनी सूचना व हरकती मंत्र्यांच्या समाजमाध्यम खात्यावरील गुगल फॉर्मद्वारे नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत पेटकेअर प्रशिक्षण संस्था सुरू होणार
Source: Prahaar