जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील वेल्हाणे गावात लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांत सासरच्या तिघांना जेवणातून उंदीर मारण्याचे औषध दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नवरी सुमन सुभाष सहाणी आणि आरती सूर्यप्रकाश पटेल या दोघींना धुळे जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. पैसे व दागिने घेऊन पसार होण्याच्या उद्देशाने कट रचल्याचा आरोप असून, विवाह जुळवणाऱ्या एजंटचीही चौकशी सुरू आहे.
जळगावात लग्नानंतर दोन दिवसांत सासरच्यांना विष, दोघींना अटक
Source: Lokshahi Marathi