महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा प्रभाव वाढला असून, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी उष्ण व दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात सरासरीपेक्षा २ ते ७ अंश सेल्सिअसने तापमान वाढले असून, कोकणात कमाल तापमान ३३ ते ३८ अंशांपर्यंत पोहोचले आहे. प्रतिचक्रवातामुळे पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पुढील २-३ दिवस उष्णता कायम राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा जोर; मुंबईसह कोकणात उष्णतेचा यलो अलर्ट
Source: Prahaar