पुण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. मात्र पक्षाच्या १२६ नगरसेवकांपैकी शंभरहून अधिक जणांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. सभागृहनेते गणेश बिडकर यांनी उपस्थितीची नोंद घेतल्यानंतर गैरहजर नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
भाजपच्या १०० हून अधिक नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस
Source: Sarkarnama