कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ 'गोकुळ'च्या अध्यक्षपदाची निवडणूक १० नोव्हेंबर रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार होणार आहे. फोडाफोडीच्या राजकारणाला आळा घालण्यासाठी महायुतीने आपल्या सर्व संचालकांना मुंबईमार्गे अलिबागला सहलीवर पाठवले आहे. महाविकास आघाडीकडून शशिकांत पाटील यांचे नाव आघाडीवर असताना सत्तासंतुलन राखण्यासाठी ही व्यूहरचना आखल्याची माहिती समोर आली आहे.
गोकुळ अध्यक्षपद निवडीपूर्वी महायुतीचे संचालक सहलीवर
Source: Jai Maharashtra News