रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांना गालावर मारल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली. १ नोव्हेंबरला दिल्लीत काँग्रेसच्या महारॅलीसाठी खासदार बसमधून जात असतानाची ही घटना असल्याचे सांगितले जाते. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्हिडिओतील दावा खोडसाळपणा असल्याचे सांगत, धानोरकर व बर्वे यांच्यात बहीण-भावाचे संबंध असल्याचे स्पष्ट केले.
बर्वे-धानोरकर व्हिडिओवर काँग्रेसचे स्पष्टीकरण
Source: Jai Maharashtra News