नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या मच्छीमारांसाठी केंद्र सरकारने दिलासा जाहीर केला आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) अंतर्गत बोटी व जाळ्यांच्या नुकसानीच्या आर्थिक मदतीचे निकष सुधारित करण्यात आले असून २०२६ ते २०३१ या कालावधीत ते लागू राहतील. मत्स्यव्यवसायाशी संबंधित शेतकऱ्यांनाही याचा लाभ मिळणार असल्याची माहिती मत्स्यविकास मंत्री नितेश राणे यांनी दिली.
आपत्तीग्रस्त मच्छीमारांसाठी मदतीचे निकष सुधारित
Source: Lokshahi Marathi