हिंगोलीत उद्धव ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. माजी आमदार संतोष टारपे आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील यांनी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश झाला. यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यास विशेष महत्त्व आहे.
हिंगोलीत ठाकरे गटाला धक्का; दोन नेते शिंदेंच्या शिवसेनेत
Source: Jai Maharashtra News