शाहरूख खान आणि दीपिका पादुकोण यांचा 'किंग' चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आहे. ओटीटी, सॅटेलाईट, म्युझिक आणि वितरण हक्कांच्या व्यवहारातून चित्रपटाने सुमारे ६६५ कोटी रुपयांची कमाई केल्याचे वृत्त आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट २४ डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार असून यात सुहाना खानही झळकणार आहे. मात्र या आकड्यांना अधिकृत दुजोरा नाही.
'किंग'ने प्रदर्शनापूर्वीच ६६५ कोटींची कमाई केली
Source: Prahaar