पश्चिम रेल्वेने एप्रिल ते ऑक्टोबर 2026 या काळात विनातिकीट व अनियमित तिकिटाने प्रवास करणाऱ्या 17.93 लाख प्रवाशांवर कारवाई करत 138.05 कोटी रुपयांचा दंड वसूल केला. केवळ ऑक्टोबरमध्ये 2.44 लाखांहून अधिक प्रवाशांकडून 21.53 कोटी वसूल झाले. मुंबई उपनगरीय विभागात 6.28 लाख प्रकरणे उघडकीस आली असून, AC लोकलमधील अनधिकृत प्रवासाची प्रकरणे 82 टक्क्यांहून अधिक वाढली.
पश्चिम रेल्वेची कारवाई; फुकट्या प्रवाशांकडून 138 कोटी वसूल
Source: Prahaar