दिवाळी आणि छठ पूजेच्या काळातील गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने वांद्रे टर्मिनस, वापी, वलसाड, उधना, सुरत आणि भेस्तान या सहा स्थानकांवर 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री तात्पुरती बंद केली आहे. प्रवाशांना सोडायला येणाऱ्यांच्या उपस्थितीमुळे प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी नियंत्रित करणे हा यामागील उद्देश आहे. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला व विशेष मदतीची गरज असलेल्यांना सवलत देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेच्या सहा स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांवर बंदी
Source: Prahaar