बदलापूरच्या सीताराम राऊळ यांना वन्यजीव फोटोग्राफीचा 'ऑस्कर'

बदलापूरच्या सीताराम राऊळ यांना वन्यजीव फोटोग्राफीचा 'ऑस्कर'

बदलापूरचे वन्यजीव छायाचित्रकार सीताराम राऊळ यांना लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियमतर्फे आयोजित 'वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर 2026' स्पर्धेत पुरस्कार मिळाला आहे. 'अपृष्ठवंशीय प्राण्यांचे वर्तन' गटात त्यांच्या 'शिफ्टिंग सँड' या राजस्थानमधील विंचवाच्या छायाचित्राला विजेतेपद मिळाले. या स्पर्धेत जगभरातून 65,050 हून अधिक छायाचित्रे आली होती.

Source: BBC Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies