स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्गावर ४४ तासांपासून आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्गावर ४४ तासांपासून आंदोलन

ऊसाला प्रतिटन ४ हजार ५०० रुपये पहिली उचल मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन आज तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील किणी टोलनाक्याजवळ पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग गेल्या ४४ तासांपासून रोखण्यात आला आहे. पालकमंत्री आणि साखर कारखानदारांसोबतची बैठक निष्फळ ठरल्याने आंदोलन तीव्र झाले असून कोल्हापूर, सांगली आणि कर्नाटकातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies