मुंबईत दिवाळीच्या दिवसांत कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या किमान तापमान २८ अंशांवर असून दिवसा उकाडा जाणवत आहे. गुरुवारी शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक १५४ नोंदवला गेला, जो 'वाईट' श्रेणीत मोडतो. फटाक्यांमुळे हवा आणखी खालावण्याची भीती असून लहान मुले व ज्येष्ठांसाठी आरोग्याचा धोका वाढला आहे.
दिवाळीत मुंबईत उकाडा आणि प्रदूषणाचा तडाखा
Source: Prahaar