शैक्षणिक व सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमांतर्गत मेक्सिकोतील विद्यापीठाचे तीन विद्यार्थी, दोन विद्यार्थिनी व एका शिक्षिकेचे शिष्टमंडळ पाथर्डी येथील श्री तिलोक जैन विद्यालयात दाखल झाले. विद्यालयाच्या पटांगणावर महाराष्ट्रीयन पद्धतीने त्यांचे शानदार स्वागत झाले. पाच दिवसांच्या दौऱ्यात रसायनशास्त्र व पर्यावरणावर संयुक्त प्रकल्प तयार होणार असून स्थानिक देवस्थाने, जीवनशैली व कुटुंबव्यवस्थेचाही अभ्यास होणार आहे.
मेक्सिकोचे विद्यार्थी पाथर्डीत; तिलोक जैन विद्यालयात स्वागत
Source: Prahaar