दिल्लीतील मयुर विहार फेज 2 येथील 'लव्हली हेरिटेज स्कूल'मध्ये तिसरीत शिकणाऱ्या 9 वर्षांच्या विद्यार्थिनीचा वर्गात अचानक कोसळून कार्डिॲक अरेस्टने मृत्यू झाला. मैत्रिणींसोबत वर्गात येताच ती बेशुद्ध होऊन पडल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. तिला तातडीने रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी मृत घोषित केले. पालकांनी वेळेत सीपीआर न मिळाल्याचा आरोप केला असून पोलिस तपास करत आहेत.
दिल्लीत शाळेत 9 वर्षांच्या विद्यार्थिनीचा कार्डिॲक अरेस्टने मृत्यू
Source: Jai Maharashtra News