ऊस दरावरून झालेल्या बैठकीत शेतकरी संघटनेने प्रतिटन 4,200 रुपयांची मागणी ठामपणे मांडली, मात्र कारखानदारांच्या एकजुटीमुळे तोडगा निघाला नाही. एकरकमी 4,000 रुपये आणि उर्वरित 200 रुपये नंतर देण्याचा तसेच एफआरपीवर 500 रुपये जादा देण्याचा प्रस्ताव चर्चेत होता. मुश्रीफ यांचा नवा फॉर्म्युलाही मान्य झाला नाही. राजू शेट्टी यांनी बोलणी फिस्कटल्याचे स्पष्ट केले.
ऊस दर चर्चा निष्फळ; राजू शेट्टी आक्रमक
Source: Lokshahi Marathi