मुख्यमंत्री देवेंद्र फडणवनी यांनी काँग्रेसवर संविधानाच्या नावाखाली देशाची घटनात्मक व्यवस्था बदलून अति डावी विचारसरणी आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. राहुल गांधी लाल संविधान हातात घेऊन फिरतात, पण त्यामागे लाल विचारांचे पुस्तक असल्याचा दावा त्यांनी केला. आरबीआय, कॅग, सर्वोच्च न्यायालय, संसद आणि निवडणूक आयोग या संस्था बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले.
काँग्रेसला संविधान बदलायचे आहे: फडणवीसांचा आरोप
Source: Lokshahi Marathi