कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) निवडणुकीत काँग्रेस आमदार सतेज पाटलांच्या आघाडीने महायुतीच्या सत्ताधारी गटावर विजय मिळवला. 'मुंबई Tak चावडी' कार्यक्रमात बोलताना पाटलांनी सांगितलं की त्यांचा अजेंडा साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा होता, तर विरोधकांचा अजेंडा सत्ता मिळवण्याचा. 4500 मतदारांपैकी सुमारे 3000 मतदारांना वैयक्तिक भेटी देत, तीन महिने आधीच 24 दिवसांच्या दौऱ्याचं नियोजन त्यांनी केलं होतं.
गोकुळ विजयाचं गणित सतेज पाटलांनी उलगडलं
Source: Mumbai Tak