महाराष्ट्र एसटी महामंडळाने सुमारे ८३ हजार कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस आणि महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ जाहीर केली आहे. यामुळे महागाई भत्ता ५८ वरून ६० टक्क्यांवर पोहोचला असून महामंडळावर सुमारे १६० कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.
एसटीच्या ८३ हजार कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर
Source: Lokshahi Marathi