शरद पवार यांना खोकला आणि श्वसनाच्या संसर्गामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात पवार यांनी 10 तारखेनंतर एकत्र बसून चर्चा करू असे सांगितल्याचे दिसते.
शरद पवार रुग्णालयात; प्रफुल्ल पटेल यांची भेट
Source: Lokshahi Marathi