जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रत्येक उमेदवारासाठी खर्चाची कमाल मर्यादा २ लाख रुपये ठरवण्यात आली असून निकालानंतर ६० दिवसांत खर्च सादर करणे बंधनकारक आहे. २१ संचालकपदांपैकी चार जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित १७ जागांसाठी ३०९ उमेदवार रिंगणात आहेत. माघारीसाठी १७ नोव्हेंबरपर्यंत मुदत असून एकाही उमेदवाराने अद्याप माघार घेतलेली नाही.
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत खर्चाला २ लाखांची मर्यादा
Source: Sarkarnama