बुलढाण्यातील काकोडा ग्रामपंचायतीच्या सरपंच मंगला इंगळे यांची तिसऱ्या अपत्यामुळे निवड रद्द झाल्यानंतर दोन अपत्यांच्या अटीचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि आलोक आराधे यांच्या खंडपीठाने २००३ मधील ‘जावेद विरुद्ध हरियाणा राज्य’ निर्णयाचा मोठ्या खंडपीठाकडून फेरविचार करण्याची आवश्यकता व्यक्त केली. देशाचा प्रजनन दर ३.०२ वरून १.९ पर्यंत घटल्याने जुन्या तरतुदींचे पुनर्मूल्यांकन आवश्यक झाले आहे.
दोन अपत्यांच्या अटीवर सर्वोच्च न्यायालयात फेरविचार
Source: Deshdoot