गोकुळवर पाच शासकीय सदस्य नियुक्तीचा अध्यादेश लागू

गोकुळवर पाच शासकीय सदस्य नियुक्तीचा अध्यादेश लागू

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) वर पाच शासकीय सदस्य नियुक्त करण्याच्या अध्यादेशावर राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी शुक्रवारी सही केली, त्यामुळे नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला. या अध्यादेशानुसार पाचपैकी चार सदस्यांना मतदानाचा अधिकार असेल. दरम्यान, समविचारी आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांनी या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तसेच सोमवारी कोल्हापुरात महामोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies