रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी येथील सर्वे क्रमांक 148/1 जमिनीवर पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या सुमारे 20 आदिवासी कुटुंबांची घरं 24 मार्च 2024 रोजी जेसीबीने पाडल्याचा आरोप झाला आहे. ही जमीन 22 फेब्रुवारी 2024 रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पत्नी सरोजिनी नार्वेकर यांनी खरेदी केली होती. आदिवासींनी पोलिसांत तक्रार दिली असून चौकशी सुरू आहे; नार्वेकर कुटुंब आणि कंत्राटदार दशरथ पाटील यांनी आरोप फेटाळले आहेत.
म्हात्रोळीतील 20 आदिवासी कुटुंबांची घरं पाडल्याचा आरोप
Source: BBC Marathi