मुंबईत रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या मेन मार्गावर माटुंगा-मुलुंड दरम्यान आणि हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान देखभालीचे काम होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या वांद्रे-गोरेगाव दरम्यानही ब्लॉक असेल. त्यामुळे अनेक लोकल सेवा रद्द राहणार असून काही मार्गांतरित करण्यात येणार आहेत.
मुंबईत रविवारी मेगाब्लॉक; अनेक लोकल सेवा रद्द
Source: Prahaar