पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्यात शुक्रवारी संसद भवनात झालेल्या भेटीमुळे पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांच्या पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतेला बळ मिळाले आहे. २०२० मध्ये कृषी कायद्यांवरून तुटलेली ही युती पुन्हा सुरू होण्याची चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युतीबाबत अंतिम निर्णय भाजपचे केंद्रीय नेतृत्व घेईल.
मोदी-बादल भेटीमुळे भाजप-अकाली दल युतीच्या चर्चांना उधाण
Source: Prahaar