रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे गावाजवळचा कातळसडा दरवर्षी पावसाळ्यात पांढऱ्याशुभ्र फुलांनी बहरतो. येथे दीपक्याडी, कापरी कमळ आणि हंसतुरा यांसारख्या दुर्मिळ वनस्पती आढळतात. काही वनस्पती नामशेष झाल्याचे मानले जात होते, तर काही मोजक्याच ठिकाणी आढळतात. पर्यावरण अभ्यासकांच्या मते, हे अधिवास जैवविविधतेच्या अभ्यासासाठी महत्त्वाचे आहेत.
पावसाळ्यात फुलणारी दुर्मिळ फुले महाराष्ट्रात कुठे दिसतात?
Source: BBC Marathi