भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात पुढील ७ दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार असून उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. जळगाव, नाशिक, जालना, परभणी, नांदेड, लातूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात ७ दिवस पावसाचा अंदाज, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
Source: BBC Marathi