महाराष्ट्र सरकारने ५०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी कंत्राटदारांच्या कामगिरीचे मूल्यांकन करून रेटिंग देण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ही माहिती दिली. १०० गुणांच्या आधारे मूल्यांकन होणार असून, ८०+ गुणांना ग्रीन, ६०-८० गुणांना येलो आणि ६० पेक्षा कमी गुणांना रेड श्रेणी दिली जाईल. रेड श्रेणीतील कंत्राटदार निविदांसाठी अपात्र ठरतील.
इन्फ्रा प्रकल्पांच्या कंत्राटदारांना कामाच्या गुणवत्तेनुसार रेटिंग
Source: Prahaar