शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली. इमिग्रेशन चेकपोस्टची मंजुरी प्रलंबित असल्याने सेवा सुरू होऊ शकत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. यामुळे मराठवाड्यातील पर्यटन, उद्योग आणि गुंतवणुकीला चालना मिळणार आहे.
संभाजीनगरसाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवेची मागणी; भुमरे यांची अमित शाहांना भेट
Source: Sarkarnama