महाराष्ट्र सरकारने शासकीय वाहनांसाठी व्हीआयपी नंबर प्लेट खरेदीवर बंदी घातली आहे. अर्थ विभागाने ११ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, यापुढे अशा नंबरसाठी कोणताही निधी मंजूर होणार नाही. हा निर्णय सर्व शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, उपक्रम, विद्यापीठे आणि अनुदानित संस्थांना लागू आहे.
शासकीय वाहनांना व्हीआयपी नंबरवर बंदी; अर्थविभागाचा निर्णय
Source: Sarkarnama