गडचिरोलीतील धानोरा तालुक्यातील जपतलई येथील आश्रमशाळेत रविवारी मध्यरात्री सहा विद्यार्थिनींना विषारी सापाने दंश केला. यात तीन मुलींचा मृत्यू झाला, तर एका गंभीर मुलीला हेलिकॉप्टरने नागपूरला हलविण्यात आले. सरकारने शाळेचा परवाना रद्द करून अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.
गडचिरोलीत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू
Source: Agrowon