रस्ता नसल्याने ज्येष्ठाला झोळीतून रुग्णालयात नेण्याची वेळ

रस्ता नसल्याने ज्येष्ठाला झोळीतून रुग्णालयात नेण्याची वेळ

तळेगाव दाभाडे येथील आंदर मावळातील कुसवली पठारावर रस्ता नसल्याने ७९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला उपचारासाठी झोळीतून डोंगर उतरवून नेण्यात आले. कुटुंबीयांनी लाकडी काठी आणि चादरीच्या साहाय्याने झोळी तयार करून दोन-तीन तासांत त्याला मुख्य रस्त्यावर आणले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने दुर्गम भागातील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Source: Sakal

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies