८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईतील गवालिया टँक मैदानावरून महात्मा गांधींनी 'चले जाव'ची ऐतिहासिक घोषणा केली. या आंदोलनाने भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाचा अखेरचा टप्पा गाठला. दुसऱ्याच दिवशी गांधींसह नेहरू, पटेल, आझाद यांना अटक करण्यात आली. या आंदोलनात देशभरातील तुरुंग भरले आणि भूमिगत आंदोलनांनी ब्रिटिशांना हैराण केले.
चले जाव आंदोलनाची गोष्ट; गांधींनी गमावला सच्चा साथीदार
Source: BBC Marathi