नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांमुळे नागरिकांना भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी खड्ड्यांसाठी एमएनजीएलला जबाबदार धरले, तर एमएनजीएलने पलटवार केला. प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे ही समस्या गंभीर बनली असून, महापालिकेने 13 अभियंत्यांना नोटिसा बजावल्या आहेत.
नाशिकच्या खड्ड्यांवर प्रशासनाची टोलवाटोलवी
Source: Deshdoot