परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील तलाठी रमेश लटपटे याने शेतजमिनीच्या फेरफार नोंदीसाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार ७० वर्षीय शेतकऱ्याने वाटणीपत्रानुसार फेरफार करण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, सापळा कारवाईपूर्वी तलाठ्याला संशय आल्याने प्रत्यक्ष लाच स्वीकारली नाही.
लाच मागणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात
Source: Pudhari