हवामान विभागाने राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. रत्नागिरी, सातारा, पुणे, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे शेतीवर परिणाम होत असताना या अंदाजामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट
Source: Prahaar